आनंदी मासिकाबद्दल


लहान मुलांच्या, आश्चर्याने आणि कुतूहलाने भरलेल्या जगातल्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या प्रयत्नातून ‘आनंदी’ हे मासिक बनवलं गेलं. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे हा या मासिकाचा प्रमुख उद्देश आहे, आणि म्हणूनच आपल्या मासिकाची भाषा ही मराठी निवडण्यात आली आहे.

प्रत्येक अंकात विद्यार्थी त्यांच्या शाळेमध्ये किंवा घरी अगदी सहजपणे करून पाहू शकतील, असे काही सोपे आणि नवनवीन उपक्रम किंवा प्रकल्प असतात. यात वैज्ञानिक संकल्पना मांडताना त्या अगदी साध्या आणि सोप्या भाषेत, मुलांच्या अवती-भवतीची उदाहरणं देत मांडल्या जातात. तुम्हालाही प्रत्येक अंक वाचताना मजा येईल हे नक्की. 

महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनही अभ्यासाची साधनं, पुस्तकं, विज्ञान शिक्षक  किंवा ऑनलाईन शिक्षण घेण्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत. अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हा आनंदी मासिक सुरु करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. विविध लेख लिहिताना, मुलांचा मागे पडलेला अभ्यासक्रम भरून काढण्याची विशेष काळजी घेतली जाते. 

असे वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी जेव्हा आम्हाला त्यांचे अनेक अनुभव व अभिप्राय लिहून पाठवतात त्यातूनच आम्हाला प्रोत्साहन मिळते.

आनंदी गावातील, आनंदी शाळेतील, आनंदी मुला-मुलींसाठी तयार केलेलं आनंदी हे मासिक तुम्हाला नक्की आवडेल….

Back to english